Posts

Showing posts from June, 2017

हिंदू धर्मातील मांसाहाराचा इतिहास आणि वर्तमान

Image
शाकाहाराची संकल्पना जगभरात रुजवण्यात, इंग्लंड-अमेरिकेतले स्थलांतरीत हिंदू आणि जैन मंडळी तसेच योग विद्येचा प्रसार याचे योगदान मोठे आहे. पण खरंतर सगळे हिंदू शाकाहारी नाहीत, किंबहुना असंही म्हणता येईल की बहुतांश हिंदू मांसाहारी आहेत. शाकाहार हिंदूंना इतर समाजापासून वेगळं करतो, अगदी अलिकडच्या काळापर्यंत पाश्चात्य समाजामध्ये शाकाहाराला विचित्र नजरेने पाहिले जाई. शाकाहार हिंदू धर्माचे गुणवैशिष्ट्य म्हणून बघितला जातो आहे, आकडेवारी काही वेगळच दर्शवत असली तरी! हिंदू धर्मीय शाकाहारी आणि मांसाहारी असू शकतात. हिंदू धर्म म्हणजे अनेकत्व, यात खुप वैविध्य आहे. ‘हिंदू धर्म’ सर्वसमावेशक आहे ज्यात अनेक जाती, संप्रदाय, परंपरा सामावलेल्या आहेत. यापैकी काही घटक काही काळाकरता शाकाहारी असू शकतील किंवा कधीच नसतीलही. हिंदूंनी काय खावे किंवा काय खाऊ नये सांगणारी कोणतीही धर्म-प्रमाण अशी बंधने हिंदू धर्मात नाहीत. एकाच प्रकारच्या चालीरीतींमध्ये हिंदू धर्माला संकुचित करण्याच्या अट्टाहासाकरता फक्त दोन गट कारणीभूत आहेत – कट्टर हिंदू आणि त्यांचे उघड शत्रू हिंदूद्वेष्ट्ये. एका तमिळ संताची गोष्ट अन्नाच्याप्रती हि...